शांततामय सहजीवनासाठी लोकशाही आघाडी

About Us

लोकशाही आघाडी कराड शहर

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व देशाचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांची कर्मभूमी असलेले कराड शहरास ऐतिहासिक व राजकीय वारसा लाभल्याने त्यास नावलौकिक प्राप्त महत्त्व प्राप्त झालेले आहे. आधुनिक कराड नगरीचे शिल्पकार आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांनी सलग 42 वर्षे या नगरीचे नगराध्यक्षपद भूषविले व नगरीचा चौफेर विकास केला. आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या काळात झालेली नगरपरिषदेची भव्य व देखणी इमारत, शहरास शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी, भव्य स्टेडियम, भुयारी गटार योजना, सांडपाण्याची जलनिःसारण योजना आदी राज्यातील अनेक मोठ्या शहरात उपलब्ध नव्हत्या त्या नागरी सुविधा आदरणीय पी. डी. पाटीलसाहेबांनी नागरिकांना उपलब्ध करून दिल्या त्यामुळे या शहरास नावलौकिक प्राप्त झालेला आहे. वरील नागरी सुविधांमुळे राज्यात नागरी स्वच्छता अभियानामध्ये देखील कराड शहराचा नेहमी वरचा क्रमांक राहिलेला आहे. अशा या कराड शहरात लोकशाही आघाडी कराड शहर या आघाडीची स्थापना नोव्हेंबर 2006 मध्ये करण्यात आली. या आघाडीने आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार स्थापनेपासून आजपर्यंतची वाटचाल सुरू आहे. आघाडीची स्थापना माजी मंत्री मा. श्री. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा. श्री. सुभाष पांडुरंग पाटील यांनी केली आहे.