शांततामय सहजीवनासाठी लोकशाही आघाडी

Our Objectives

आघाडीचा उद्देश

  1. कराड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणूका कायद्यानुसार तयार झालेल्या संविधानावर दृढविश्वास व निष्ठा ठेवून त्यातील सर्व तरतूदीचे सन्मानपूर्वक पालन करुन लढविणे.
  2. समाजवाद, धर्मनिरपेक्षता व लोकशाही या तत्वाचे विशेष लक्ष देऊन व या तत्वांचे पालन करुन कराड नगरपरिषदेची निवडणूक लढविणे.
  3. कराड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक भारताची प्रभुत्वसंपन्नता, एकता व एकात्मता सन्मानपूर्वक मान्य करुन व त्यास पोषक राहील अशा पध्दतीने लढविणे.
  4. कराड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी उमेदवारांची निवड करणे व निवडलेल्या उमेदवारांना आघाडीतर्फे पुरस्कृत करणे.
  5. कराड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे वेळी जाहीर केलेल्या कार्यक्रमाची / जाहीरनाम्यातील कार्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणे.
  6. आघाडीतर्फे पुरस्कृत केलेल्या व निवडून आलेल्या सदस्यांनी आघाडीचे सदस्य म्हणून कराड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ( नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत ) आघाडीच्या उद्देश पूर्तीसाठी एकमताने प्रयत्न करणे व तसा प्रयत्न होत आहे याकडे लक्ष ठेवणे.
  7. कराड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध सभापती निवड तसेच नामनिर्देशित सदस्य यांची निवड करणे संबंधी निवडणूक लढविणे.
  8. आघाडीतील निवडून आलेल्या सदस्यांशी विचार-विनिमय करून कराड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध सभागृहातील आघाडीच्या नेत्याची निवड करणे.
  9. कराड तालुका व परिसरामध्ये सामाजिक, राजकीय प्रश्नांबाबत मोर्चा काढून, घेराव करुन अथवा अन्य मार्गाने निदर्शने करणे तसेच अशा बाबतीतील घटनेबाबत जरुर तर निषेध करणे.